उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची जिज्ञासा व बुद्धिमत्ता यांचा सहसंबंधात्मक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.1366/z203wj27Abstract
21 व्या शतकात मानवाच्या मुलभूत गरजा विस्तारत जाऊन यामध्ये शिक्षण आणि चांगले आरोग्य यांचा हे समावेश होतो.यापैकी मानवी जीवनाचा चौफेर विकासासाठी शिक्षण ही अत्यावश्यक बाब आहे. ही गोष्ट लक्षात घेता भारतीय राज्यघटनेनूसार वय वर्षे 14 पर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण करण्यात आले. मनुष्याचा सर्वांगीण विकास हा फक्त बुद्धिमत्तेमुळेच शक्य झाला आहे. मनुष्य आणि प्राणी यांच्यात जीवनशैलीविषयक भेद हा फक्त बुद्धिमत्तेमुळेच स्पष्ट दिसून येतो. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून व्यकक्तमत्वाच्या विविध पौलूना यात योग्य तो आकार दिला जातो. शिक्षण जीवनात उत्क्रांती घडवून आणते. हे करीत असतांना अभ्यासक्रम संदर्भात त्यांच्यामध्ये वेगवेगळया भावनांचा अविष्कार होतो व नित्य नवीन येणा·या, घडणा·या गोष्टी जगण्याची उत्सुकता म्हणजेच जिज्ञासा त्यांच्यात निर्माण होत असते.जिज्ञासा हा शब्द मनुष्याला त्याच्या अंतिम क्षणापर्यंत भुलवत असतो. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला शैक्षणिक जीवनाची पुढील पायरी म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण होय. या वयामध्ये विद्यार्थी ब·यापौकी जागृत होतो. व त्याला उज्ज्वल भवितव्याची स्वप्न साकार करण्याविषयीची इर्षा निर्माण होते. साहजीकच त्याच्या मनाला नवीन ज्ञानाविषयी जागृती व जिज्ञासा निर्माण होत असते.