कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिवृत्तीचा अभ्यास

Authors

  • निलिमा चौधरी, डॉ. मनिषा चौधरी, Author

DOI:

https://doi.org/10.1366/0z4yt160

Abstract

आजचे युग हे विज्ञान युग आहे. विज्ञानाची प्रगतीची जाणीव व्हावी इतके विज्ञान सामान्य जीवनाशी एकरुप झालेले आहे. विज्ञानाचा अंतर्गत व बाह्य परिणाम पाहता आणि विज्ञानाच्या तत्त्वावर आधारलेल्या मानवी जीवनात योग्य अशा छंदाची जाण करुन देऊन वेळेचा सदुपयोग करण्याची क्षमता विज्ञानात आहे.  विज्ञानाने निर्माण केलेल्या अत्याधुनिक साधनांमुळे आपले जीवन अधिकाधिक सुलभ बनत आहे. एका बाजुला हे घडत असतांना दुसऱ्या बाजूला मात्र देवळापुढील वाढणाऱ्या रांगा, पाऊस पडावा म्हणून केले जाणारे यज्ञ, मंत्र, चमत्कार दाखविणाऱ्या बुवांच्या नादी लागणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. याचे एकच कारण म्हणजे वैज्ञानिक अभिवृत्तीचा अभाव होय. हे लक्षात घेऊन उद्याचा भावी नागरीक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक अभिवृत्ती किती प्रमाणात आहे हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत संशोधन योजिले आहे. वैज्ञानिक अभिवृत्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीमागील कार्यकारणभाव जाणून घेणे होय. वैज्ञानिक अभिवृत्ती म्हणजे विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची व विशिष्ट पद्धतीने कृती करण्याची क्षमता होय.

Published

2006-2025

Issue

Section

Articles

How to Cite

कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिवृत्तीचा अभ्यास. (2025). Leadership, Education, Personality: An Interdisciplinary Journal, ISSN: 2524-6178, 18(12), 811-818. https://doi.org/10.1366/0z4yt160