जागतिकीकरण, भाषा आणि संस्कृती
DOI:
https://doi.org/10.1366/nk513b57Abstract
भारत आज जागतिक महासत्तेकडे वाटचाल करतांना दिसत आहे. 21 व्या शतकाची खरी नांदी जागतिकीकरणातूनच सुरू झाली. 21 वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. ज्ञानाला मर्यादा नसतात. ज्याला ते आत्मसात करता येते त्याचेच ते होते. आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासात ज्ञानोपासक मग तो कोणत्याही देशातील असो, कोणत्याही धर्मातील असो, कोणत्याही पंथातील असो पण त्यांनी केलेले संशोधन, लावलेले विविध शोध, त्यांनी जगाच्या ज्ञानात तसेच समाजाच्या हितासाठी टाकलेली भर यामुळे मानवजातीचे नव्हे आखिल मानवजातीचे जीवन संपन्न झाले आहे. जागतिकीकरणामुळे तसेच विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवीन शोधांमुळे जग अगदी जवळ आले आहे. हे आपल्याला ''कर लो दुनिया मुट्ठी में'' या एका वाक्यावरून समजते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जागतिकीकरणाचे दोन मेरूमणी मानले जातात. संबंध जगामध्ये वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती करण्याचे काम यांनी केले आणि इंटरनेट व संगणकामुळे सर्व जग हे 'जागतिक स्वरूपाचे खेडे' (Global Village) बनले आहे.



