नागनिकेच्या आदर्शवादी प्रशासनाची आवश्यकता: काल, आज आणि उद्या
DOI:
https://doi.org/10.1366/hkntnr27Abstract
शुभांगी भडभडे लिखित ‘नागनिका’ कादंबरी ही नागनिकेच्या प्रशासनाचे शकनिका प्रथम राज्यकर्ती म्हणून तिच्या व्यक्तिरेखेचे एकमेव प्रकाशित दस्तावेज आहे म्हणून तिला ऐतिहासिक कादंबरीचा दर्जा मिळाला आहे. सातवाहनांच्या कुळाची सुरुवात करणारी श्रीमुख (सिमुख) सातवाहन राजाची ती सून तर सातवाहनांचे वैभव शिखरावर नेणाऱ्या सिरी सातकर्णीची ती पत्नी होती. शक शालीवाहन संवत्सर सुरू करणारा राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच कुळातील २३ वा राजा होता परंतु सातवाहनाच्या राज्याची पायाभरणी करणारे सिमुक व सिरी सातकर्णी आणि नागनिका प्रथम राज्यकर्ती ठरते ती आदर्श का? आपण इ. सन. वी पूर्व ६९ मधील क्लिओपात्राला प्रथम राज्यकर्तीचा दर्जा देतो मग तिच्या आधीच्या इ. सन पूर्व २०० वर्ष नागनिकेला का नाही? तो हक्क नागनिकेचाच आहे यासाठी नागनिकेचे प्रशासन काल आज आणि उद्या कसे आदर्शवादी ठरते याविषयी विचार मांडणार आहोत. सांकेतिक शब्द नागनिका यवन, शक, पतेनिक, जुन्नर येथील नाणेघाट, अश्वमेध व राजसूय यज्ञ इत्यादी.



